आमच्याविषयी

सविनय स्नेह.

‘सम्यक संवाद’ हा समाजात सम्यक परिवर्तन इच्छिणाऱ्यांचा एक मंच आहे. कार्यकर्त्यांचा संच आहे. यात विविध चळवळींत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबरच, विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार, वकील, लेखक, तंत्रज्ञ आदि पेशांतील मंडळींचा समावेश आहे. ऑनलाईन नियतकालिक, फिल्म क्लब, चर्चा या प्रकारचे उपक्रम सध्या आम्ही करत आहोत. या उपक्रमांत सहभागी होणाऱ्यांतूनच सम्यक संवादशी लोक जोडले जात असतात. अलिकडेच आम्ही संविधानातील मूल्यांचा प्रसार करण्याचेही काम हाती घेतले आहे.

ठळक उपक्रमः

• ‘सम्यक संवाद’ आंतरजालीय नित्यकालिक (www.samyaksanvad.com)

• ‘सम्यक संवाद’ फेसबुक पेज (https://www.facebook.com/samyaksanvad)

या दोहोंचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने ही नित्यकालिके आहेत. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य दृकश्राव्य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. वृत्तपत्रे-नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले साहित्य त्यांच्या सौजन्याने पुनर्मुद्रित करता येईल. लिखित साहित्‍य ’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. ‘सम्यक संवाद’वरील मुख्‍य व्‍यवहार मराठीतच असला तरी इंग्रजी साहित्‍याचेही स्‍वागत आहे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः samyaksanvad@gmail.com

• ‘सम्यक संवाद’ फिल्म क्लब

कलास्वादासाठीची अभिरुची तसेच सामाजिक जाणीवा यांच्या जोपासनेसाठी हा उपक्रम आहे. यात सामुदायिकरित्या फिल्म पाहिली जाते व नंतर त्यावर चर्चा केली जाते.

• संविधानातील मूल्यांचा प्रसार

संविधानाच्या सरनाम्यातील मूल्यांचा-संकल्पनांचा अर्थ आपल्या मनात पक्का असणे म्हणजेच राष्ट्राचा पाया मजबूत असणे होय. ही मूल्ये-संकल्पना समजून सांगणे, त्यावर चर्चा करणे यासाठीच्या मोहिमा जागोजागी होणे म्हणूनच गरजेचे आहे. ज्यांना याची जाणीव आहे, असे अनेक लोक यारीतीचे उपक्रम करतही आहेत. ‘सम्यक संवाद’ तर्फेही आम्ही असे कार्यक्रम घेत असतो. आपल्या संपर्कातील महाविद्यालयात/शाळेत विद्यार्थ्यांबरोबर या विषयावर आपण सत्र ठरवू शकता. सर्वसाधारणपणे एका वर्गात बसतील एवढी संख्या आम्हाला अभिप्रेत आहे. मांडणी व चर्चा धरुन सत्राला सर्वसाधारणपणे २ तास वेळ लागतो. असे सत्र घेण्यातही आपण सहभाग देऊ शकता.

यापेक्षा वेगळे व अधिक उपक्रम पुढे घ्यायचे आहेत. आपणही त्याबाबत सूचना व सहकार्य करु शकता.

आपण आमच्याशी कार्यकर्ते, हितचिंतक, उपक्रमांतील सहभागी अशा विविध प्रकारे जोडून घेऊ शकता. कोणत्याही प्रकारे आमच्या संपर्कात आपण राहू इच्छित असाल, तर तसे आपण खालील ईमेलवर अथवा संपर्क क्रमांकांवर कळवावे, ही विनंती.

सदिच्छांसह,
‘सम्यक संवाद’ कार्यकर्त्यांचा संच
_______________________________________________________
samyaksanvad@gmail.com / 9004121595, 9403652622, 8097544320

संपादक मंडळ
सुरेश सावंत, उल्का महाजन, उमेश खाडे, सोनाली शिंदे, शैलजा तिवले, अश्विनी गोळे

तांत्रिक मार्गदर्शन
सुनिल गजाकोश

1 thought on “आमच्याविषयी

  1. खूप छान उपक्रम आहे. आपल्या कार्याला सुभेछा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *