Connect with us

कार्यकर्त्यांसाठी टिपणवहीः भाग १ व २ – संजीव चांदोरकर

संघटना/कार्यकर्ते

कार्यकर्त्यांसाठी टिपणवहीः भाग १ व २ – संजीव चांदोरकर

प्रिय साथी / कॉम्रेड्स,
गेली काही वर्षे मी परिवर्तनाचा वाटसरू मध्ये कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी मानून चळवळी तील विविध मुद्यांवर छोटी टिपणे लिहिली होती. मी सातत्याने लिहू शकलो त्यामध्ये तुमच्या पैकी अनेकांनी वेळोवेळी दिलेला feedback महत्वाचा होताच.
युनिक आकाडेमी पुणे यांनी ती टिपणे दोन पुस्तकांमध्ये छापली  आहेत.
  • तरुण होतकरू कार्यकर्त्यांसाठी टिपणवही (भाग एक; पृष्ठे १४४;किमत ५० रुपये)
  • जुन्या जाणत्या कायकर्त्यांसाठी टिपणवही (भाग दोन;पृष्ठे १७४;किमत ६० रुपये)

डावी चळवळ आहे कोठे ? तरुण कार्यकर्ते आहेत कोठे ? असे प्रश्न चळवळीच्या बाहेरच  नव्हे तर चळवळीत देखील विचारले जातात. आपण फक्त आपल्या आयुष्यापुरता विचार करायचे ठरवले तर या प्रश्नात थोडे  फार तथ्य असेल देखील. पण …

… पण मानवी समाजातील आक्राळ विक्राळ प्रश्न सोडवण्यासाठी येणा-या तरुण पिढ्यांना पुढाकार घ्यावाच लागेल, आणि तरुण तेव्हढे विचारी व संवेदनाशील आहेत नक्कीच. हे करताना ते परत एकदा डाव्या राजकीय विचारांकडेच वळतील हे देखील नक्की !

अशावेळी आपल्या तरुणपणापासून झालेल्या वैचारिक, भावनिक, कौटुंबिक, संघटनात्मक गोच्या खुल्या दिलाने त्यांच्या समोर शेअर करण्याची गरज आहे. ‘टिपणे याच स्पिरीट मध्ये लिहिली आहेत.

कार्यकर्त्याची आर्थिक कुवत ही त्याच्या पर्यंत टिपणवही पोचणार की नाही या साठी निकष नसला पाहिजे हे तुम्ही देखील मान्य कराल. यासाठी एक corpus तयार करून किमत फक्त ५० रुपये व ६० रुपये ठेवली आहे.

तुम्ही टिपणवही वाचावी, चळवळीच्या औपचारिक अजेंड्यावर नसलेल्या पण शक्तिपात करणा-या अशा अनेक प्रश्नांवर पुढाकार घेवून वाचिक, लिखित व्यासपीठांवर चर्चा व्हाव्यात व मुख्य म्हणजे तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या तरुणांपर्यंत ही टिपणे पोचवावीत यासाठी हे आवाहन.

टिपणवही साठी व टिपणवही बद्दल मला chandorkar.sanjeev@gmail.com या मेलवर वा मोबाईल वर (99202 80036) किंवा admin@theuniqueacademy.com वर नक्की संपर्क करा.

धन्यवाद.

संजीव चांदोरकर

 टिपणवही १
टिपणवही २
Tipanvahi_Malprushtha

More in संघटना/कार्यकर्ते

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top