Connect with us

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –

अवतरणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –

२५ डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन. भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणूनही तो पाळला जातो. स्त्रियांविषयी बाबासाहेब म्हणतात-

‘हिंदू लोकांत स्त्री म्हणजे एक पुरुषाच्या चैनीची वस्तू आहे, असा सर्वसाधारण समज आहे आणि पुरुषाच्या इच्छेनुसार स्त्रियांनी वागावे, अशी सर्वांची समजून असते. स्त्री म्हणजे चैनीची वस्तू समजली गेल्यामुळे तिच्या शरीराला वस्त्रप्रावरणांनी व दागदागिन्यांनी शृंगारण्यात बऱ्याच धनाचा व प्रेमाचा व्यय होतो हे खरे, तथापि माणूस म्हणून तिला कोणत्याच प्रकारचे हक्क हिंदू धर्मात देण्यात आलेले नाहीत. जड जीवाची जोपासना करण्यास संपत्तीचा वारसा तिला नाही तो नाहीच, पण शिक्षण घेऊन मन सुसंस्कृत करण्याचा अधिकारही तिला नाही. आमच्या शास्त्रात गाईला आत्मा आहे, असे सांगून ख्रिस्ती लोकांना लाजवू पाहणारे हिंदू लोक स्त्रीला आत्मा आहे, असे जरी मानीत असले तरी कृतीने तसे दाखवीत नाहीत, हे खरे.’

(दिनांक १५ जुलै १९२७ च्या ‘बहिष्कृत भारत’ या वर्तमानपत्रातील ‘आजकालचे प्रश्न’ या सदरातील हा उतारा)

More in अवतरणे

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top