Connect with us

राष्ट्रवादाविषयी टागोर व नेहरु काय म्हणतात?

राजकीय

राष्ट्रवादाविषयी टागोर व नेहरु काय म्हणतात?

राष्ट्रवादाविषयी टागोर व नेहरु काय म्हणतात?

भारताचे राष्ट्रगीत रचणाऱ्या, भारताविषयी असीम प्रेम असणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यानच्या राष्ट्रवादाविषयी मतभेद नोंदवला होता. या महान कवीचा हा मतभेद तितक्याचा तोलाचा होता, हे लक्षात घ्यायला हवे.
इंग्रजांविरोधी लढ्यासाठी जो राष्ट्रवादाचा ज्वर जनतेत आपण तयार करत आहोत, त्याने जनतेच्या मनात परकीयांविषयी दुस्वास, द्वेष यांचे रोपण होते असे त्यांना वाटे. ‘राष्ट्रवाद व परकीयांविषयीचा द्वेष यांतील फरकाची रेषा फार सूक्ष्म असते’ असे ते म्हणत. त्यांच्या मते ही ‘राष्ट्रवादाची गुलामी आहे. राष्ट्रवादाच्या या गुलामीचे बंध तोडून अखिल मानवजातीचे ऐक्य ते अपेक्षितात. ”देशाविषयीचे प्रेम जेव्हा त्याची पूजा करु लागते तेव्हा वाताहत अटळ असते. मी देशाची सेवा करायला तत्पर आहे. पण त्याची पूजा करणे हा मी त्याचा अवमान समजतो.” हे त्यांच्या १९१६ सालच्या ‘द होम अँड द वर्ल्ड’ कादंबरीतील नायकाच्या तोंडचे उद्गार आहेत. या नायकाकरवी टागोरच बोलतात असे मानले जाते.
ब्रिटिशविरोधी राष्ट्रवादी संग्रामातील एक अग्रणी नेते व या संग्रामातून तयार झालेल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रवादाविषयी काय म्हणतात हे पाहणेही उद्बोधक ठरेल. २० सप्टेंबर १९१५ रोजी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ते इशारा देतात-
‘पारतंत्र्यात असताना राष्ट्रवाद ही सर्वांना एकवटणारी, ताकद देणारी शक्ती असते. …नंतर मात्र ती संकुचितवादाकडे जाते. आक्रमकता व आपणच कसे श्रेष्ठ याकडे तिचा प्रवास होतो. प्रभुत्ववाद जन्मास येतो. …अशाची अखेर सर्वनाशात होते. उदा. जर्मनी, जपान. भारतासारख्या विभिन्न भेद असलेल्या देशात बहुसंख्याक याची शिकार होऊ शकतात.’
किती डोळस व चिकित्सकपणे देश रचणाऱ्या महान मंडळींचा वारसा आपल्याला मिळाला आहे हा! तो कदापि धूसर होऊ देता कामा नये.
 – सुरेश सावंत

More in राजकीय

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top