Connect with us

राष्ट्रवाद: ओबामा व ट्रम्प यांच्या वेगळ्या भूमिका

राजकीय

राष्ट्रवाद: ओबामा व ट्रम्प यांच्या वेगळ्या भूमिका

राष्ट्रवाद: ओबामा व ट्रम्प यांच्या वेगळ्या भूमिका

शासनकर्त्यांच्या विचारसरणी कशा प्रभाव टाकतात, याचे अमेरिकेतील अलिकडचे एक उदाहरण पाहणे उद्बोधक ठरेल. कॉलिन केपर्निक हा अमेरिकेतील एक सुप्रसिध्द फूटबॉल खेळाडू. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच्या मैदानातील राष्ट्रगीतावेळी अन्य सहकारी उभे असताना बसून राहिला.
‘जो देश काळ्या तसेच गौरेतर नागरिकांवर अन्याय करतो त्याच्या राष्ट्रध्वजाला मी मान देणार नाही. याविषयी निषेध नोंदवणे ही मला खेळापेक्षा अधिक महत्वाची बाब वाटते.’ ही त्याची भूमिका होती.
यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटल्या. त्यातल्या तेव्हाच्या व होऊ घातलेल्या अमेरिकन अध्यक्षांच्या प्रतिक्रिया अधिक बोलक्या आहेत.
होऊ घातलेले (आता झालेले) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात- ‘ही भयानक गोष्ट आहे. त्याने त्याला योग्य असा दुसरा देश शोधावा.’
तर मावळते अध्यक्ष बराक ओबामा म्हणतात- ‘आपले म्हणणे मांडायला तो त्याचा घटनात्मक अधिकार वापरतो आहे. त्याच्या सचोटीविषयी मला संशय नाही. ज्यांविषयी चर्चा व्हायला हवी अशा वास्तव व वैध प्रश्नांविषयी तो बोलतो आहे. ज्यांचा विचार व्हायला हवा अशा या मुद्द्यांना त्याच्या या कृतीने चालना मिळाली आहे.’
आपल्याकडे मोदी व अमेरिकेत ट्रम्प. देशोदेशी उजव्या शक्तींचे भरात येणे. काय होणार आहे जगाचे व पर्यायाने आपल्या देशाचे? सत्ता व संघटनबळावर, खोट्यानाट्या चलाख्यांनी, धूर्त, निर्दयी कारवायांनी ते राष्ट्रवादाचे कोणते अर्थ लोकांच्या डोक्यात ठासणार आहेत, हे पुरेसे स्पष्ट आहे. प्रश्न आहे आपण काय करायचे हा.
अनेक गोष्टी कराव्या लागतील. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कायदेशीर अशा विविध आघाड्यांवर मोर्चेबांधणी करावी लागेल. त्यात राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान आदींच्या सम्यक अर्थाची जोपासना व त्यांचा प्रचार हे एक महत्वाचे काम राहणार आहे.
सुरेश सावंत

More in राजकीय

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top