Connect with us

२४ सप्टेंबर १६७४ – समतामूलक शिवराज्याभिषेक दिन

सर्व

२४ सप्टेंबर १६७४ – समतामूलक शिवराज्याभिषेक दिन

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ स्वराज्य स्थापनकरायचे नव्हते, तर प्रजेचा कौल देणारे सुराज्य निर्माण करायचे होते. यासुराज्य निर्मितीसाठी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांसाठी, वतनदारांसाठीआणि अन्य सेवक, सैनिकांसाठी आचारसंहिताच तयार केली होती.

१९ मे १६७३ रोजी चिपळूणास पडलेल्या छावणीतील लष्करी अधिकाऱ्यासमहाराजांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, सैन्याची रसद मिळण्याचीव्यवस्था काटेकोर व जुजबी रीतीने व्हावी, परंतु त्यामध्ये रयतेस त्रास होऊनये, याची दक्षता घ्यावी. या पत्रात महाराजांची रायातेविषयीची तळमळ शब्दाशब्दांतून प्रकट होते, “ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरू लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की, मोगल मुलकात आले त्याहूनही तुम्ही अधिक! ऐसा तळतळाट होईल.” याच पत्रात महाराज म्हणतात कि,सुगीच्या दिवसांत जागता पहारा ठेवा रात्री उंदीर दिव्याच्या वाती ओडून नेतील आणि गरीब बिचाऱ्या कुणब्यांच्या शेतीचे आगीने नुकसान करतील.

५ सप्टेंबर १६७६ रोजी प्रभावालीच्या सुभेदारास लिहिलेल्या पत्रात महसुल अधिकाऱ्यांना सांगतात, “ऐसियास चोरी न करावी, इमाने इतबारे साहेब कार्यकरावे, एक भाजीच्या देठास, तेही मन न दाखविता रास व दुरुस वर्तणेरायेतीचा वाटा रायतेस पावे आणि राजभाग आपणास येई ते करणे, रयतेवर काडीचे जाल व गैर केलीया साहेब तुजवर राजी नाहीत ऐसे बरे समजणे. कष्टकरून गावाचा गाव फिरावे.” याचाच अर्थ रयतेच्या भाजीज्या देठास हि योग्यमोबदला न देता हाथ लावु नये अशी ताकीदच ते महसुल अधिकाऱ्यांना देतात. याच पत्रात गरीब शेतकऱ्यांजवळ बैल नाहीत, नांगर नाहीत, अशाशेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. त्यांना पोटापुरते धन्य दयावे अशा सूचनाही महाराजांनी केल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण केली होती.नारळ व सुपारी या पदार्थांची विक्री कमी दारात केली जाते आणि जकात वसूल व्यवस्थित होत नसल्याचे नजरेस येताच याबाबत प्रभावालीच्या सुभेदारासताकीद देताना महाराज सांगतात, “जकात वसुली नियमानुसारच झालीपाहिजे.” महाराजांचे धोरण देशी व्यापाराला उत्तेजन देण्याचे होते. देशीवस्तूंना बाजारात उठाव मिळावा म्हणून परदेशातून येणाऱ्या वस्तूंवर अधिकप्रमाणात जकात बसविण्याचे त्यांचे धोरण होते.

सत्तेचा गैरवापर, व्यभिचार यांसारख्या गुन्ह्यांना महाराजांनी कठोर शिक्षा फर्मावल्या होत्या. महाराजांची नीती श्रीमंतांची छाटणी आणि गरिबांनावाटणी हि होती. महाराजांची सैन्यांना आज्ञा असे, “लुट करतांना गरीब, साधू,फकीर वैगारेंना लुटू नये. तांबे, पितळ वैगरे हलक्या वस्तूंना हाथ लावू नये.हिरे, मोती, सोने, चांदी वैगरे मौल्यवान वस्तू लुटाव्यात. सर्व लुट सरकारातजमा करावी.”

असे कल्याणकारी सुराज्य निर्माते प्रजाहितदक्ष, दुर्बल शेतकऱ्यांचे कैवारी,देशी व्यापाराला उत्तेजन देणारे, गरीब रयतेचे संरक्षक, महान शासनकर्त्याशिवाजी राज्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे नतद्रष्ट कोण होते हेआपण जाणून घेतले पाहिजे. शिवरायांनी आणि मावळ्यांनी शोर्य आणि कर्तबगारीने निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्याचा खजिनाशिवराज्याभिषेकाच्या दक्षिणेपोटी लुबाडणारे आणि तरीही शिवरायांना राजेम्हणून अस्वीकार करणारे कर्मठ लोक हे बहुजनद्वेष्टे आहेत. आणिम्हणूनच २४ सप्टेंबर १६७४ साली शक्तपंथीय निश्चलपुरीचे गोसाविंकडून”समतामुलक शिवराज्याभिषेक” करणे हा राजांचा क्रांतिकारी निर्णय होता.

आधुनिक भारतातील मानवतावादी संस्कृतीचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतीराव फुलेंनी याच महान दिनाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १८७३साली “सत्यशोधक समाजाची स्थापना” केली. सत्यशोधक धर्म म्हणजे आधुनिक भारतातील समाजरचनेची पुनर्रचना करण्याचा आरंभ बिंदू. सत्यशोधक धर्म म्हणजे मानवी स्वातंत्र्य, मानव अधिकार व मानवीसमानतेच्या उच्चतम जीवनमूल्यांचा अविष्कार बहुजनांनी सत्यनिष्ठा,नैतिकता आणि समतेची मुल्ये प्रस्थपित करणारा २४ सप्टेंबर हा दिन घरोघरीसाजरा केला पाहिजे.

॥ ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो ॥

– जितेंद्र जाधव

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in सर्व

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top