सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. फोटो, व्हिडिओ क्लिप्सही देता येतील. वृत्तपत्रे-नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले साहित्य त्यांच्या सौजन्याने पुनर्मुद्रित करता येईल. चळवळींचे संपूर्ण अंकही अपलोड करता येतील किंवा त्यांच्या लिंक्स देता येतील. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असल्‍यास जसेच्‍या तसे टाकता येईल. अगदी अशक्‍य असल्‍यास पीडीएफ फाईल पाठवावी. ‘सम्यक संवाद’वरील मुख्‍य व्‍यवहार मराठीतच असला तरी इंग्रजी साहित्‍याचेही स्‍वागत आहे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः samyaksanvad@gmail.com

आपल्याकडून अपेक्षाः
• इंटरनेटवरील मजकूर जगात कोठूनही वाचता येतो. संदर्भासाठी सर्च केल्यास तातडीने समोर येतो. तो कॉपी-पेस्ट करता येतो. चळवळींनी-कार्यकर्त्यांनी (खरे म्हणजे कोणीही) आपले लेखन, वृत्तांत वेबसाईटवर टाकल्यास ते कायमचे डॉक्युमेंटेशन होऊन जाते. अधिक लोकांपर्यंत पोहोचते. ‘सम्यक संवाद’ या वेबसाईटच्या उपक्रमाचे महत्व त्यादृष्टीने समजून घ्यावे.
• हा उपक्रम अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीने आपल्या सूचना हव्या आहेत.
• साहित्य गोळा करणे, निवडणे, संपादन करणे यात सहकार्य हवे आहे.
• मराठी युनिकोडमध्ये विनामूल्य टायपिंग करून देणारे स्वयंसेवक हवेत. पाठवलेला मजकूर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार टाईप करून ईमेल करायचा आहे.
• या वेबसाईटच्या संयोजनात सहभागी मंडळी चळवळ तसेच अन्य व्यवधाने सांभाळून त्यात लक्ष घालत आहेत. यथावकाश त्यांच्या साथीला निश्चित वेळ देणारे (अंशकालीन/अर्धवेळ) लोक लागतील. त्यांच्या मानधनाची व्यवस्था करावी लागेल. वेबसाईटच्या जागेसाठीचे भाडे द्यावे लागेल. यासाठीचा निधी कसा उभा करता येईल, यासंबंधी आपल्या सूचना व सहकार्य मिळावे.

2 thoughts on “सहभागी व्हा

  1. आपले लेख माझ्या साप्ताहिकात प्रकाशित करता येईल का ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *