बाबुराव (प.बा.) सामंत संघर्ष पुरस्कार प्रदान समारंभ २०१३ – अध्यक्ष पुष्पाताई भावे यांचे भाषण

बाबुराव (प.बा.) सामंत संघर्ष पुरस्कार प्रदान समारंभ २०१३.

रेशनिंग कृती समितीचे कार्यकर्ते सुरेश सावंत यांना २७ ऑक्टोबरला केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव, मुंबई येथे मा. पुष्पाताई भावे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५०,००० रु., मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पाताई भावे तर प्रमुख पाहुणे दत्ता बाळसराफ व मिलिंद मुरुगकर होते. प्रास्ताविक ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रमोद निगुडकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलमनामा साप्ताहिकाचे संपादक युवराज मोहिते यांनी केले.

या कार्यक्रमातील विविध भाषणांची चित्रफित सुषमा सामंत यांनी तयार केली व त्याच्या क्लिप्स YouTube वर अपलोड केल्या. अशारीतीने चळवळीचे Documentation करण्याकडे आपण लक्ष देत नाही, हा त्यांचा रास्त आक्षेप आहे. त्या स्वतः याचा ध्यास घेऊन हे काम करत असतात. इतरांनीही ते करावे, याचा त्या प्रचार करत असतात.

या सर्व चित्रफिती पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.