चलो आझाद मैदान – मुंबई! २ डिसेंबर, २०१३

Chalo-Azad-Maidan

२० ओगस्ट २०१३ रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा पुणे येथे निर्घृण खून करण्यात आला. या हत्येच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले.डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनानंतर ४८ तासात शासनाने १८ वर्षे प्रलंबित असलेल्या जादूटोणाविरोधी वटहुकुम काढला. विधिमंडळाच्या २०१३ च्या नागपूर अधिवेशनात या वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर होणे अनिवार्य आहे. अन्यथा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे हौतात्म्य वाया गेले असेच म्हणावे लागेल.

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रत्येकाच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करत असत आणि तीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अधिकृत भूमिका आहे. विरोध आहे तो देवाधर्माच्या नावे चालणाऱ्या अघोरी प्रथांना आणि शोषणाला! महाराष्ट्राचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा प्रचंड संख्येने एकत्र येणे गरजेचे आहे.

(स्रोतःhttp://actnow.bharatvivek.org/mumbai-rally-m/)