माणसाचेच गाणे गावे

Dhasal

नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही
गुलाम करू नए, लुटू नये,
काळा गोरा म्हणू नये,
तू ब्राह्मण, तू क्षत्रिय,
तू वैश्य, तू शूद्र
असे हिणवू नये ,
नाती न जाणण्याचा
आय भैन न ओळखण्याचा गुन्हा करू नये
आभाळाला आजोबा आणि
जमिनीला आजी मानून
त्यांच्या कुशीत
गुण्या गोविंदाने, आनंदाने रहावे
चन्द्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे
एक तीळ सर्वानी करवंडून खावा
माणसावर सूक्त रचावे
माणसासाठी
– नामदेव ढसाळ
{‘माणसाने’या कवितेतून}