किशोरावस्था व आक्रमकता – डॉ. प्रदीप पाटकर

प्रश्न १ -teenage व teenager किशोरावस्था व किशोर म्हणजे नेमके काय ? त्यात स्पेशल ते काय ?

उत्तर- ही एक सैराट अवस्था समजूया.भरपूर उर्जा असलेली,गतिमान,वेगवान देह-मनाची हि स्थिती.विवेक अविवेक समजून घ्यायला,थोडे थांबायला वेळ नसलेली !–tender,tearful,tremendous energy असलेली,trial-error वापरणारी,twisted[समजायला क्लिष्ट],घाबरलेली(terrified),स्वत:च एक terror,नाजूक,संवेदनशील,कशानेही सहज प्रभावित होणारी हि मंडळी.नवे आदर्श शोधणारी,जुने आदर्श नको असलेली.आतून दुखावलेली (traumatised, delicate, complex). बऱ्यापैकी over-confident,थोडक्यात सांगायचे तर धमाल, terrific मनोवस्था.

प्रश्न २ -हल्ली या मुलांमध्ये आक्रमकता दिसून येते ती का ? पूर्वीची बाळे शांत होती व आजची जास्त स्मार्ट आगाऊ चिडकी आहेत का ?

उत्तर २ -पूर्वी होता कि राग. व्यक्त करायला वाव नव्हता,वाडवडील-काका-मामा-आत्याची भीती वाटायची. आता त्यांनाच मुलांची भीती वाटू लागलीय.

प्रश्न ३ -मुळात आक्रमकतेबद्दलच काही सांगा. त्याची नजरेत पटकन येणारी लक्षणे कोणती ?

उत्तर ३-आक्रमकतेत प्रथम नाराजी-विचारातच न घेणे-हट्ट करीत राहणे-धमक्या देणे- न ऐकणे –राग-संताप-उलट उत्तरे देणे-आवाज चढविणे-वस्तू ची तोडफोड,शाब्दिक हल्ला,व त्यानंतर शारीरिक हल्ला अशी चढती श्रेणी असते.

प्रश्न ४ -संयम,संयत वागणे मुलांना आवडत/रुचत नाही का ?

उत्तर ४- आक्रमकतेचे समाजाला कौतुक आहेसे दिसते.प्रश्न सोडविण्याऐवजी समोरच्यावर धाऊन जाऊन त्याला गप्प बसविण्याचेच उपाय लोक वापरताना दिसतात.ते प्रयत्न तात्पुरते यशस्वी होतानाही दिसतात.नम्र माणसाला कुणी विचारात घेतनाही,उद्धट माणसाकडे लगेच लक्ष दिले जाते.नैतिकतेचे,विवेकाचे,सामाजिक बांधिलकीचे प्रशिक्षण मुलांना मिळत नाही(मिळाल्यास रटाळ,प्रचारकी स्वरुपात ते मेंदूत घुसविण्याचा प्रयत्न मुलांना फारसा रुचत नाही). तसे जगणारे आदर्श आजूबाजूला क्वचित आढळतात.मुलांच्या आधुनिक जगाच्या सुखाच्या व्याख्येत असे जगणे फिट बसत नाही.संयत वागण्यातील सुख सतत उसळणाऱ्या,उतावीळ,आवेगी,असुरक्षित किशोरावस्थेला विशेष आकर्षक वाटत नाही.

प्रश्न ४ -निराश मुले आक्रमक होतात का? स्वत:ला इजा करून घेतात का ?[सेल्फ हार्म ]

उत्तर ४ -काही मुले स्वत:ला होणारा त्रास चुपचाप सहन करतात.असह्य झाले तर स्वत:ला इजा करून घेतात.अधिक त्रास झाल्यास आत्महत्येकडे वळतात.हा गंभीर प्रश्न आहे कारण त्या मुलांचा अव्यक्त त्रास इतरांना कळण्यास कठीण जातं/कळेपर्यंत उशीर झालेला असतो.

प्रश्न ५ -आजकाल teenagers अधिक आक्रमक/हिंसक का झाले आहेत ? आक्रमकतेची कारणे काय असतात ?

उत्तर ५ -आज स्पर्धा,ताणतणाव,आव्हाने,वेग,गर्दी,एकटेपण,जबाबदारी,अपेक्षा,खर्च,अनिश्चितता,अनेक पर्याय व म्हणून निवडीबाबतचा गोंधळ (confusion)-सर्वच वाढलय.जवळचे जिवलग वाटावेत असे मित्र/नातेवाईक उरलेले नाहीत हि भावना वाढली आहे.चांगली करमणूक,व्यायाम,खेळ,छंद यांची जोपासना करता येत नाही.स्वत:चे गुण अवगुण,सामर्थ्य-त्रुटी-संधी-धोके-हे समजून घेण्यासाठी वेळ,संधी व मार्गदर्शन मिळत नाही.या सर्व निराशा मनात साठत जातात व त्यांचे एक स्फोटक रसायन मनात जमत जाते.ह्या रसायनाचा स्फोट होण्यासाठी मग मतभेदाची एखादी छोटीशी ठिणगी देखील पुरते.

प्रश्न ६ -आक्रमकता हे मानसिक त्रासाचे/ आजाराचे लक्षण आहे का ?

उत्तर ६ -होय.हे मानसिक त्रासाचे प्रतिबिंब/उत्प्रेक्षण असू शकते.ते मानसिक आजाराचे एक महत्वाचे लक्षण असू असते.त्यामागील कारणांचा शोध घेता येतो,उपाय करता येतात. MR,EPILEPSY AUTISM LD ADHD ODD-CD SCHIZOPHRENIA BIPOLAR DISORDER INTERMITTENT EXPLOSIVE DISORDER,IMPULSE CONTROL DISORDER PERSONALITY DISORDERS ENDOCRINAL DISORDERS काही BRAIN TUMOURS ADDICTIONS असे कितीतरी आजार आहेत ज्यात आक्रमकता हे लक्षण दिसून येते.वेळीच उपचार करून ही आक्रमकता आटोक्यात आणता येते.

प्रश्न ७ -प्रसारमाध्यमे टीवी मोबाईल इंटरनेट ह्यामुळे हे असे होत आहे का? हे आक्रमकतेच्या प्रसाराला कितपत जबाबदार आहेत ?

उत्तर ७ -आक्रमकता/हिंसा/खून मारामाऱ्या यांच्या पडद्यावरील सतत प्रदर्शनाने मुलांच्या मनात हिंसक परिणामाबद्धल असंवेदनशीलता,बधिरता,वा उत्सुकता तयार होऊ शकते.

प्रश्न ८ -यावर उपाय आहेत का? हे असे असायचेच,नंतर होतील ठीक असे समजायचे काय ? की फक्त हताशपणे सहन करीत रहायचे ?

उत्तर ८ -मुळात आक्रमकता,उद्धट वृत्ती वाढते आहे हे लक्षात येताच त्यामागील कारणांचा शोध घ्यावा. गाफील राहू नये,उशीर करू नये,काळावर/नशिबावर/मंत्र ताईत-आशिर्वाद-सिद्धींची कृपा-देव देवस्की,-नवस-सायासMIDBRAIN ACTIVATION,स्वयंघोषित/तज्ज्ञ नसलेल्या समुपदेशकांचे सल्ले घेत राहणे इ. भ्रामक उपायापाठी वेळ पैसे शक्ती खर्च करू नये.तेथे येणाऱ्या अपयशाने हातपाय गाळून दैवावर/काळावर प्रश्न सोडून देऊन गप्प (निवांत) बसू नये.आधुनिक विज्ञानाचा आधार घ्यावा.

प्रश्न ९ -जाता जाता parting message काय देता येईल ?

उत्तर ९ – teenagers are terrific.ती मस्त मंडळी आहेत.त्यांना समजून घ्या,सोबत राहा,संवाद सुसंवाद असू द्या,विसंवाद नको. ‘उसंवाद’(उसवलेला संवाद) नको.उपदेश कमी,मार्गदर्शन – विवेकी मदत वेळेवर व रागरंग बघून द्या,जग समजून घ्यायला त्यांना मदत करा.त्यांची अफाट उर्जा चांगल्या सामाजिक कामाकडे वळवा.त्यांची १० ते २० वर्षे त्यांना समजून घ्या. पुढची अनेक वर्षे ती तुम्हाला समजून घेतील.

  • डॉ.प्रदीप प.पाटकर

patkar.pradeep@gmail.com