चलो आझाद मैदान – मुंबई! २ डिसेंबर, २०१३

२० ओगस्ट २०१३ रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा पुणे येथे निर्घृण खून करण्यात आला. या हत्येच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले.डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आदरांजली – डॉ. प्रदीप प. पाटकर

डॉ. दाभोलकर हे आमच्यासाठी समाज कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण होते. प्रचंड उरक, अमाप उत्साह, अपार कष्ट, प्रयत्नवादाचे मूर्तिमंत उदाहरण, सत्शील वर्तन, निष्कलंक चारित्र्य, समाजाची उत्तम जाण, समाजातील पीडितांच्या दुक्खाबाबत कणव, जाणीव, सहवेदना, आयुष्य वाहून टाकणारा निरलस कार्यकर्ता व नेता. विशेषणे अपुरी ठरावित असे जीवन चरित्र.

सावधान, रात्र वैऱ्याची आहे!

हा मुद्दा फॅसिझम विरुद्ध लोकशाही, धर्मांध शक्ती आणि सर्वधर्मसमभावाचा विचार आणि प्रगत भारत विरुद्ध सनातनी भारत यांच्यातील घनघोर संघर्षाचा आहे. नरेंद्र दाभोलकर हे या वेदीवरचे बळी आहेत. हा एका व्यक्तीचा खून नाही, तर महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभ्या राहिलेल्या महाराष्‍ट्रावरचा खुनी हल्ला आहे. ज्या प्रवृत्तींनी नथुराम गोडसे निर्माण केला त्याच प्रवृत्ती अजून समाजात दबा धरून बसलेल्या आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.